दिल्लीतील दंगलीची १०० टक्के जबाबदारी केंद्राचीच; पवारांचा हल्लाबोल


मुंबई : दिल्लीतील दंगलीची १०० टक्के जबाबदारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचीच असून ही दंगल रोखण्यात आणि कायदा व सुव्य वस्था राखण्यात केंद्रीय गृहमंत्री ठरल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वक्तव्येही या दंगलीला कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला.


चुनाभट्टीच्या सोमय्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्ता शिबिराचं आयोजन केलं होतं. त्याला संबोधित करताना शरद पवार यांनी दिलीतील हिंसाचारावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. दिल्ली शहर अनेक भाषिकांचे आहे. राजधानीचे शहर आहे. दिल्लीच्या निर्मितीपासूनच भाजपाला जनतेचा पाठिंबा मिळण्याची चिन्हे नव्हती. सत्ता मिळण्याची चिन्हंही दिसत नाही. त्यामुळे आधार घेऊन जातीय सलोखा बिघडवण्याचे काम झाले आहे, असा थेट आरोप शरद पवार यांनी केला.


दिल्लीतील विधानसभा निवडणुकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा प्रचाराचा रोख पाहिला तर धार्मिक तेढ निर्माण करणारा होता. पंतप्रधान यांचे भाषण ऐकले तर लक्षात येते. देशाचं नेतत्व करणारी व्यक्तीच धार्मिक वितंड वाद वाढवण्याचे वक्तव्य करते हे चिंताजनक आहे, असंही ते म्हणाले. मिळालेली सत्ता जनतेसाठी वापरण्याऐवजी भाजपचे नेते 'गोली मारो'ची भाषा करताना दिसले. दिल्लीच्या शाळेवरही हल्ला केला गेला. शैक्षणिक वस्तू नष्ट केल्या गेल्या. शैक्षणिक करण्यासाठी भक्तांच्या मदतीने पावले टाकली जात आहेत, अशी चिंता व्यक्त करतानाच जी शक्ती देशाच्या ऐक्याला धक्का देण्यासाठी सरसावत आहे, तिला दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दिल्लीत येतात आणि त्याच राज्यात दंगली होतात. तरीही जाहीरपणे देशाच्या भल्याची वक्तव्य के ली जातात, हा अजबच प्रकार आहे, असा टोलाही पवार यांनी लगावला. सांस्कृतिक राजधानी उद्धवस्त करण्याचे काम करणाऱ्या शक्तीला या निवडणुकीत बाजूला सारण्याचे काम झाले आहे. त्यासाठी आपण सर्वजण एकत्र आले पाहिजे. ऐक्याचे चित्र त्यांना बघवत नाही. समाजासमाजात आग बायकाला असा आरोप त्यांनी केला.


आजचे राज्यकर्ते धर्म, जातीचा आधार घेऊन फूट पाडण्याचे काम करत असतील तर दहेरी शक्ती पदे सरसावत असतात. त्यामुळे ही जातीय शक्ती घालवण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस अग्रभागी असेल. अन्याय-अत्याचाराच्या भीती निर्माण करून जातीयवाट निर्माण करून दंगली घडवन आणणा-या शक्तीला खड्यासारखे बाजूला करायचे आहे. ही जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे, असे ते म्हणाले. देशात सांप्रदायिक विचार रुजवले जात आहेत. दिल्लीची अधिकाराची सीमा कमी आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याचा अधिकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जसे आहेत तसे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना नाही. ती सगळी जबाबदारी गृहमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे ही जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही, असा आरोप पवारांनी केला.


उद्योग अडचणीत आहेत बेरोजगारी वाढली आहे असे चित्र आज देशात आहेतरीही केंद्रातील सत्ताधाऱ्यांना भविष्याची चिंता यांना नाही. ज्या पक्षाला ३०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या त्या पक्षाचे सरकार काही राज्यात राहिलेले नाही. महाराष्टात सरकार आले नाही. देशाच्या हिताचा मक्ता चुकीच्या लोकांच्या हातात दिला ही भावना आता लोकांमध्ये निर्माण झाली आहे, असंही त्यांनी निदर्शनास आणले.