‘त्यांना वाटते की, मी आदेशावर स्वाक्षरी करेन


ठाणे : अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांच्या भाषणावर टिप्पणी करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, आतापर्यंत सर्वांनी मराठीत भाषण केले. परंतु, भुजबळजी फार हुशार आहेत. त्यांनी अर्धे भाषण मराठीत व मला ते समजण्यासाठी अर्धे हिंदीत केले. त्यांना वाटतेमंत्रिमंडळाचे आदेश माझ्याकडे येताच मी स्वाक्षरी करेन' असा टोला लगावताच श्रोत्यांमध्ये एकच हशा पिकला.


येथील उपवन तलावाच्या काठावर संस्कृती आर्ट फेस्टिव्हल शुक्रवारपासून पुढील चार दिवस चालणार आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते. यावेळी त्यांनी महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देऊन आणि संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचे कौतुक केले. याप्रसंगी व्यासपीठावर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, आमदार प्रताप सरनाईक आदींसह कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींसह पद्मश्री प्रसिद्ध गायक खेलास खेर आदी उपस्थित होते.


आधीच सरंपचनिवडीच्या मुद्यावरून राज्यपाल चर्चेत आहे. त्यात त्यांनी असे भाष्य केल्यामुळे यापुढे राजकीय वर्तुळात नक्कीच तर्कवितर्क लढून ते पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांनी एका आदिवासी गावात मुक्कामाला राहिल्याचे सांगून आदिवासी गरीबाच्या घरात पुढील जन्म घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.


Popular posts
जेजुरी येथील खंडोबाचे मंदिर (इतिहास)
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करा! लॉक डाऊनग्रस्त श्रमिकांना सहाय्य करा!! मेधा पाटकर आणि सहकाऱ्यांचे केंद्र व राज्य शासनाला आवाहन!!!
Image
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
Image
गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या एका सराईताला एलसीबीकडून अटक
Image