ठाणे जिल्ह्याची सागरी किनारा क्षेत्र आराखडा (CZMP) संदर्भात जन सुनावणी झाली


सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडा (CZMP) बाबत हरकती व सूचना देण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्याची जन सुनावणी 4 मार्च 2020 रोजी  व मुंबई उपनगर जिल्ह्याची जन सुनावणी  5 मार्च 2020 रोजी झाली. या सुनावणीना दोन्ही जिल्ह्यातील कोळीवाडा गावठाण मधील बहुसंख्य बांधव, माता, भगिनी सुनावणीला आप आपल्या गावातून जातीने हजर होते व त्यांनी त्यांच्या हरकती व सूचना अभ्यासपूर्ण व प्रभावीपणे मांडल्या तसेच  ठाणे जिल्ह्यातील कोळीवाडा गावठाण मधील आपल्या भूमिपुत्र बांधव माता भगिनी नी  6 मार्च 2020 रोजी ठीक 11: 30 वाजता नियोजन भुवन जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे पश्चिम येथे आपल्या शाश्वत विकासासाठी व आपल्या न्याय हक्कासाठी उपस्थित राहिल्या व आपले हरकती सूचना व आक्षेप अभ्यासपूर्ण व प्रभावीपणे नोंदविले. ठाणे शहर गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समितीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.