हे सरकार 'ठाकरे' नव्हे; राष्ट्रवादी चालवत आहेः पाटील


नगर : नागरिक त्व कायदा आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून शहरी नक्षलवादी आणि डाव्यांक डू न देशात प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आघाडी सरकार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चालवत नसून राष्ट्रवादी काँग्रेस चालवतेय, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शिर्डी येथे आले होते. शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला. सीएएमुळे देशातील मुस्लिमांचे नागरिकत्व रद्द होणार नाही. उलट पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशसारख्या इस्लामिक देशातील छळ वादाला कंटाळू न भारतात आश्रयाला आलेल्या हिंद, जैन, शिख, बौद्ध आदींना नागरिक त्व मिळणार आहे. पण यावरून शहरी नक्षलवादी आणि डाव्या विचारांच्या व्यक्ती चुकीचा अपप्रचार करन मुस्लिम समाजात भीतीचं वातावरण निर्माण करत आहेत. सीएए कायद्यावर मुस्लिम समाजातील ज्यांना आक्षेप आहेत. त्यांनी पुढे येऊन आपले म्हणणे मांडावेत्यांना कुणीही आडवलेलं नाही. मात्र शहरी नक्षलवादी आणि डाव्यांना हे होऊ द्यायचं नाही. त्यांना देशात अराजकता माजवायची आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. यावेळी मुस्लिम आरक्षणावरून त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. देशातील मुस्लिमांना ओबीसी आरक्षणा अंतर्गत आर क्षणाचा लाभ पूर्वीपासूनच मिळत आहे. तसेच केंद्रातील मोदी सरकारने आर्थिक दृष्ट्या दर्बल घटकातील व्यक्तींना १० टक्के आरक्षण यापूर्वीच दिलं आहे. याद्वारे मुस्लिम समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना याचा लाभ मिळत आहे. मग स्वतंत्र आरक्षण देण्याची गरज काय आहे ? असा सवाल करताना मुस्लिम आरक्षण हा मुस्लिम समजाची दिशाभूल करण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. राज्यातील सरकार हे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चालवत नसून, राष्ट्रवादी काँग्रेस चालवते. त्यामुळे शरद पवारांना हवे तेच निर्णय राज्य सरकार घेत आहे, असा आरोपही त्यांनी केला.गेल्या सरकारमध्ये भाजपसोबत शिवसेनाही सत्तेत सहभागी होती. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीतील निर्णयास शिवसेनेची मंजूरी होती. तर मग आताच मागच्या सरकारमधील निर्णयांना स्थगिती का दिली जात आहे? मराठवाड्यातील जनतेला पाणी मिळावं यासाठी वांटर ग्रीडचा जो निर्णय घेण्यात आला.


Popular posts
‘अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त’ पदाचा श्री. संजीव जयस्‍वाल यांनी पदभार स्‍वीकारला
Image
चतुरस्त्र लेखक, गूढकथाकार, नाटककार, विचारवंत रत्नाकर मतकरी यांचे दुःखद निधन
Image
जेजुरी येथील खंडोबाचे मंदिर (इतिहास)
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करा! लॉक डाऊनग्रस्त श्रमिकांना सहाय्य करा!! मेधा पाटकर आणि सहकाऱ्यांचे केंद्र व राज्य शासनाला आवाहन!!!
Image