कल्याण पूर्वेत आणखी एका ठिकाणच्या पदपथावर सुलभ शौचालयाची निर्मिती !


कल्याण : कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी स्मशान भूमी आणि नेहरूनगर विठ्ठलवाडी पूर्व येथे पदपथावर सुलभ शौचालयाची बांधकामे सोशल मिडीयाच्या माध्यमातून वादात सापडली असतांनाच आता असाच आणखीन एक धक्कादायक प्रकार चक्की नाका येथील पदपथावर उघड झाला आहे .


नागरीकांना चालण्यासाठी असलेल्या पदपथांवर धार्मिक स्थळांसह कसल्याही प्रकारचे असलेले अडथळे काढून टाकण्यात यावेत या मा . उच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासत न्यायालयाच्या नाकावर टिच्युन कल्याण पूर्वेतील पदपथावर आणखिन एक सुलभ शौचालय बांधण्यात येत आहे .


चक्की नाका येतील वाहतूक शाखेचे कार्यालयाच्या मागील पदपथावर हे सुलभ शौचालय बांधले जात आहे !