मी सुरक्षित तर देश सुरक्षित - मी माझा रक्षक


ठाणे : दिनांक २५ मार्च २०२० रोजी महात्मा जोतिबा फुले नगर कळवा मधील चिंतामणी सोसायटी मध्ये कोरोनाच्या रोग वाढत जात असताना सोसायटीतील सर्व रहिवाश्यांच्या मदतीने सर्व बिल्डिंग स्वच्छ डेटॉल,फिनेल. च्या माध्यमातून स्वच्छ करण्यात आले त्याच बरोबर बिल्डिंग मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी बिल्डिंग बाहेरील जागेत पाण्याची टाकी व डेटॉल हँडव्हाश ठेवण्यात आले आहे जेणे करून बाहेरून आलेला माणूस योग्य ती काळजी घेऊन येईल. लोकांना ही आवाहन आहे की सर्वांनी आप आपल्या परीने आपल्या विभागातील सुरक्षा योजना करावी जेणे करून कोरोना ला टाळता येईल.सर्व नागरिकांना त्याच बरोबर काही सूचना करण्यात आले.


१) मास चा वापर करा
२) खोकताना व शिंकताना रुमाल चा वापर करा
३) जेवणा आगोदर हात स्वच्छ धुवा व सॅनेटायझर चा वापर करा.
४) संसायस्पद कोणी रुग्ण दिसल्यास डॉक्टर व हॉस्पिटलमध्ये संपर्क करा. 
५) कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सुरक्षेचे नियम पाळूया.
६) गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून आरोग्याची काळजी घेऊया.
आशा अनेक सूचना करण्यात आले व कोरोनाच्या संकटाला मात करण्यासाठी एक पाऊल पुढे. सरकार , पोलिस स्टेशन , हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स आपआपल्या परीने काम करीत आहे तरी आपण एक त्यातला खादीचा वाटा उचलून आपण आपली सुरक्षा केली पाहिजे म्हणून आम्ही हे केले व नागरिकांना ही हेच आम्ही सांगतोय की आपापल्या परीने योग्य ती काळजी घ्या. 



माझे आरोग्य माझी जबाबदारी
कोरोना हरेल देश जिंकेल


आपलाच मित्र


अजय भोसले