अंबरनाथ - २४ मार्च पासून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला असला तरी प्रसारमाध्यमे अत्यावश्यक सेवेत मोडत असल्यामुळे माध्यमांचे प्रतिनिधी फिल्डवर काम करत आहेत.
फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर आणि वृत्तवाहिन्यांचे पत्रकार अनेक ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी जातात. यावेळी अनेक ठिकाणी त्यांचा करोनाबाधित व्यक्तिंशी संपर्कात येण्याची दाट शक्यता असते.
या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा पत्रकार परिषद व अंबरनाथ होमिपॅथिक असो.च्या वतीने अंबरनाथ बदलापूर मधील पत्रकारांना 'आर्सेनिक अल्बम ३०' या होमिओपॅथिक औषधाच्या बॉटल्सचे वितरण करण्यात आले.
यावेळी अंबरनाथ होमिओपॅथी असो.चे डॉ.सागर धाडस,डॉ. गजानन धानिपकर डॉ.भारत सोनावणे, डॉ.कविता धानिपकर डॉ. अमोल दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.