ठाणे : लोकमान्य नगर येथे महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, चैन खेचून जबरी चोरी करणाऱ्या इसमास वर्तक नगर पोलिसांनी मोट्या शिताफीने पकडले आहे व त्याच्या कडून 1, 66, 000/-रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
या बाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस उप आयुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी, एस, आव्हाड यांच्या तपास पथकातील ए एस आय यादव, पोलीस हवालदार भोसले, पोलीस शिपाई काटकर, जामगे, सोनवणे यांनी आरोपीला अटक केली.
मिलिंद लक्ष्मण सुतार असे या इसमाचे नाव असून तो राहण्यास नवरंग चाळ रूम नंबर 7लोकमान्यनगर पाडा नंबर -4 येथे आहे, बेरोजगार असलेला हा इसम कुठलाही कामधंदा करत नव्हता, पैशाची चणचण भासत असल्या मुळे त्याची पावलं गुन्हेगारी कडे वळली, सकाळी पहाटे उठून हाफ पॅन्ट घालून डोक्यावरून शाल ओढून बाहेर पडायचा व कुठली महिला समोरून येताना दिसली की तिच्या गळ्यातील चैन खेऊन गल्लीतून पसार व्हायचा, ह्या साठी तो कुठलिही मोटार सायकल वापरत नव्हता, परिसरातीलच असल्यामुळे त्याला गल्लीबोळाची चांगली माहिती होती, त्यामुळे चैन खेचल्या नंतर तो गल्लीतून पळून जात असे, पोलिसांना या बाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी या आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली, सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या मदतीने त्यांना माहिती मिळाली, की फिर्यादी यांनी केलेल्या वर्णनाशी मिळताजुळता इसम लोकमान्यनगर येथील गोळीबार मैदाना जवळ येणार आहे, त्या प्रमाणे मैदानाजवळ शोध घेतला असता मिलिंद लक्ष्मण सुतार या इसमाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या कडे चौकशी केली असता त्याने आता पर्यंत 11 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 6 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 10 ग्रॅम वजनाची चैन, 10 ग्रॅम वजनाची सोन्याची माळ, 5 ग्रॅम वजनाची सोन्याची माळ 3 ग्रॅम वजनाची कानातील सोन्याची वेल असा 1, 66, 000/- रुपयाची सोन्याचे दागिने चोरल्याचे सांगितले, पोलिसांनी हे सगळे दागिने जप्त करून त्याला अटक केली आहे.