तलवारीचा धाक दाखवून बलात्काराची धमकी देत श्रीगोंद्यात दरोडा 


श्रीगोंदा- येथील शहरातील भोळेवस्ती परिसरात आज पहाटे आदिवासी समाजाच्या महिलेच्या घरावर दरोडा टाकण्यात आला. महिलेवर तलवारीने वार करीत जखमी केले आहे.


सोन्याचे दागिने घेवून पसार होणारे आरोपी अत्याचार करण्याच्या तयारीने आले होते मात्र अनर्थ टळल्याची महिती पोलिसांकडून समजली.


दरम्यान जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक आखिलेशकुमार यांनी रात्रीच घटना स्थळास भेट दिली. या घटनेचा छडा लावण्यासाठी आखिलेशकुमार यांनी श्रीगोंद्यात तळ ठोकला आहे.


समजलेली अधिक माहिती अशी की, भोळे वस्ती शिवारात राहणाऱ्या एका महिलेच्या घरावर सात अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. या महिलेस तलवारीचा धाक दाखविला.


शारिरीक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. एक हजार किमतीचा मोबाईल व तीन हजार किंमतीचे दागिने लंपास केले.व घरातील सामानाची उचकापाचक करुन निघून गेले.


ही  महिला जखमी झाली असून तीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.