संगम गावात जमावबंदीचे उल्लंघन करीत सरपंच पतीला धक्का बुक्की, मुरबाड पोलिसांत गुन्हा दाखल !


मुरबाड : कोरोना सारख्या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात जमावबंदी असुनही, संगम ग्रामपंचायत कार्यालयात जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन करीत तेथील जमावाने या गावातील


"सरपंच" बाईच्या पतीला धक्का बुक्की केल्याने सदर इसमांविरोधात मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


याबाबत मिळालेली माहिती  अशी कि, दिनांक 31/03/2020 रोजी.


मुरबाड मधील संगम ग्रामपंचायत कार्यालया  ग्रामसेवक आल्याने काही ग्रामस्थांनी  गर्दी केलेली दिसुन आली.खरं तर  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुर्ण देशात जमावबंदी कलम 144 लागु केला आहे. तरी ह्या महत्वपुर्ण आदेशाचे उल्लंघन करुन संगम गावा मधील काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालया मध्ये गर्दी केली होती, ह्यामध्ये दोन स्थानिक सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.


ह्या ग्रामस्थांना गावातील"सरपंच "बाइचे पती दिनेश जाधव या सुशिक्षित तरुणाने ग्रामपंचायत कार्यालयातील   गर्दी बघुन प्रश्न विचारला  की संचारबंदी असताना आपण लोकांनी शासनाचे सर्व नियम धाब्यावर मारुन  इतकी गर्दी का केली आहे,याशिवाय सेफ डिस्टंसिंग सुद्धा ठेवलेले दिसत नाही.,त्यावेळेस तेथे उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थांनी त्या तरुणाला धक्का बुक्की करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा या घटनेची तक्रार मुरबाड पोलिस स्टेशनमध्ये   नोंदवण्यांत आली आहे. मात्र अजुन कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.


ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमावबंदीचा आदेश धाब्यावर बसवून त्या गावातील राजेंद्र संभाजी यशवंतराव, नितीन गुलाब यशवंतराव, प्रदिप गुलाब यशवंतराव, केतन अरविंद यशवंतराव, संकेत काशिनाथ यशवंतराव, शाम मधुकर घरत, मंगेश काशिनाथ यशवंतराव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.