'लॉकडाऊन'असताना दोन वाहने सोडण्यासाठी मागितली २० हजारांची लाच


उर्से – द्रुतगती मार्गावरून जाणाऱ्या दोन वाहनांना सोडण्यासाठी महामार्ग सुरक्षा पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाने २० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोड करून १५ हजार रुपये स्वीकारले. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचल्याचा संशय आल्याने संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षक त्याच्या कारमधून भरधाव वेगात पसार झाला. ही घटना बुधवारी (दि.२९) रात्री सव्वा नऊ वाजता उर्से टोलनाका येथे घडली.


सत्यजित रामचंद्र अधटराव असे आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी ४१ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.


आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक महामार्ग सुरक्षा पथकात महामार्ग पोलीस केंद्र वडगाव येथे कार्यरत आहे. तक्रारदार हे बाल रोड लाइन्स यांच्या हायड्रोलिक/ एक्सएल गाडीवर चालक आहेत. तक्रारदार त्यांच्या गाडीतून पवनचक्कीचे नेसल घेऊन चेन्नई वरून राजकोटकडे जात होते. तक्रारदार आणि त्यांचे सहकारी यांचे अशी दोन वाहने आरोपी लोकसेवकाने मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका येथे अडवून ठेवली. दोन्ही वाहने लॉकडाउन उठल्यानंतर (३ मे) नंतर सोडली जातील, असे आरोपीने तक्रारदार चालकाला सांगितले.


दोन्ही गाड्या लगेच सोडायच्या असतील तर प्रत्येक गाडीचे १० हजार असे एकूण २० हजार रुपये लाचेची मागणी केली.तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रात्री सव्वानऊ वाजता सापळा रचला. त्यावेळी आरोपीने १५ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली. त्यानंतर आरोपी लोकसेवक याना संशय आल्याने लाचेची रक्कम टेबलवर फेकून स्विफ्ट डिझायार (एम एच 42 / ए एच 1811) या कारमधून बेदरकारपणे धोकादायक पध्दतीने चालवून पुण्याकडे पळून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक सुनील बिले, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक टिळेकर, अंकुश माने, चालक पोलीस शिपाई चंद्रकांत कदम यांच्या पथकाने केली.


 


Popular posts
‘अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त’ पदाचा श्री. संजीव जयस्‍वाल यांनी पदभार स्‍वीकारला
Image
जेजुरी येथील खंडोबाचे मंदिर (इतिहास)
Image
चतुरस्त्र लेखक, गूढकथाकार, नाटककार, विचारवंत रत्नाकर मतकरी यांचे दुःखद निधन
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करा! लॉक डाऊनग्रस्त श्रमिकांना सहाय्य करा!! मेधा पाटकर आणि सहकाऱ्यांचे केंद्र व राज्य शासनाला आवाहन!!!
Image