मुरबाड मध्ये आढळला पहिला कोरोना ग्रस्त रुग्ण


मुरबाड : जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, भारतातही त्याचा धुमाकुळ वाढत असुन, आजपर्यंत निश्चंत आणि निरोगी आरोग्य असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शहरात आज पहिला कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली असुन, एका 37 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याने संपूर्ण शहर तीन दिवसांसाठी लाँकडाऊन करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सदर बिल्डिंग सील करण्यात आली आहे. तर तीन किलोमीटरचा परिसर क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे.