खोपट भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून धान्याचे वाटप


ठाणे (प्रतिनिधी) : गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली खोपट परिसरातील नामदेववाडी, हंस नगर, रमाबाई नगर आदी भागात ठाणे शहर सरचिटणीस संतोष तिवारी यांचेवतीने धान्याचे वाटप करण्यात आले. 


लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्‍या लोकांची मोठी कोंडी झाली आहे. उत्पन्नाचे सर्व स्त्रोत बंद झालेले असल्याने गोरगरीबांची मोठी कोंडी झाली आहे. ही बाब ओळखून ठाणे शहर सरचिटणीस संतोष तिवारी, प्रदेश प्रतिनिधी सुरेंद्र उपाध्याय, हेमंत वाणी आदींनी  या भागामध्ये 3 किलो तांदूळ, 2 किलो तूरडाळ, मीठ, मसाला आदी जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप केले. 


या भागात राहणारे मजूर, रिक्षाचालक आदी कुटुंबांना ही मदत त्यांनी केली. ही मदत करीत असताना त्यांनी प्रांतीय, परप्रांतीय असा कोणताही भेद न केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतूक केले आहे.