कोल्हापूरमध्ये वाळू तस्करी करणारे १४ ट्रक जप्त


कोल्हापूर - येथील वाळूची बेकायदा चोरटी वाहतूक करणारे १४ ट्रक पोलिसांनी जप्त केले.


पुढील कारवाईसाठी हे ट्रक करवीर प्रांत कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. 


या कारवाईने वाळू तस्करांना दणका बसला आहे.


राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे या गस्त घालत होत्या. 


त्यांना या हॉस्पिटलच्या जवळ वाळूचे ट्रक उभे असल्याचे दिसले. त्यांनी चौकशी केली असता या ट्रक चालकांकडे वाळूचे स्वामित्वधन भरल्याच्या पावत्या मिळाल्या नाहीत.


बेकायदेशीररीत्या वाळू वाहतूक केली जात असल्याचे आढळून आल्याने त्यांनी १४ ट्रक जप्त केले.


यामुळे वाळू तस्करीचा विषय पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे.


Popular posts
कोव्हीड 19 बाधित व नॉन कोव्हीड उपचारासाठी स्वतंत्र रुगणालये घोषित, मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे आवाहन
Image
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
या आठवड्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता : एंजल ब्रोकिंग
Image
बळीराजा सुखावला; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
Image