समाजसेवक दर्शन शेट्ये व सागर चंबावणे यांच्या सौजन्याने लागले मुरबाड बस डेपोला सँनिटायझर मशीन   


मुरबाड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या एस. टी. महामंडळातील असंख्य कर्मचारी तसेच कामगार यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना ही बाब लक्षात येताच मा.  आमदार श्री गणेशजी नाईक साहेब (मा. मंत्री) तसेच मा. आमदार श्री किसनजी कथोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक  श्री. दर्शन सुनील शेटे व श्री सागर सुनील चंबावणे यांच्या सौजन्याने मुरबाड बस डेपोला  सँनिटायजर शॉवर मशीन लागले असुन, त्याचे  अनावरण करण्यात आले. याप्रसंगी मुरबाड पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रेय बोराटे साहेब तसेच आगार प्रमूख श्री नायकोडे साहेब यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी ही  उपस्थित होते.


एस.टी.बस म्हटली कि,ग्रामीण भागातील  सर्वसामान्य जनतेची जिवन दाहिनी,कोणीही, कुठेही हात दाखवा,आणि बस थांबवा असे ब्रीद, मग याच एस.टी.बस मध्ये सर्वसामान्य जनतेला सेवा देणारे,चालक,वाहक,यांना दिवस रात्र सर्व प्रवासी जनतेत मिसळून काम करावे लागते.त्यात कोरोना सारखा आजार हा संसर्गजन्य असुन कधी कोणा पासुन कसा संसर्ग होईल आणि त्यांचा जिव धोक्यात येईल.याची खात्री नाही. म्हणून सर्वसामान्य जनतेला रात्रंदिवस अविरतपणे सेवा देणा-या एस.टी.कर्मचाऱ्यांचा  कोरोना पासुन  बचाव होण्यासाठी सावधानता म्हणून मुरबाड चे तरुण तडफदार, समाजसेवक, दर्शन शेट्ये व सागर चंबावणे यांनी मुरबाड एस.टी.बस डेपोला सँनिटायझर शाँवर मशीन देवून एस.टी.कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न केला असुन समाजात आजपर्यंत या तरुणांनी संकटसमयी अनेकदा अनेकांना समाजकार्यात आपले मोलाचे योगदान देवून सहकार्य केले आहे.तसेच  आपलं कर्तव्य बजावलं आहे.आजच्या या प्रसंगी एस.टी.डेपो तर्फे त्यांचे कौतुक केलं जात आहे.