पवना नदीत पोहताना दोघे बुडाले ; एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरु


तळेगाव - नातेवाईकांबरोबर पवना नदीवर पोहायला गेलेले दोघेजण पाण्यात बुडाले. यातील एकाचा मृतदेह हाती लागला तर दुसऱ्याच्या शोध सुरू आहे. बेबडओहोळ (ता. मावळ) येथे सकाळी साडे अकरा वाजता ही घटना घडली.


संतोष ऊर्फ दादा बाळासाहेब घारे (वय ३२, रा. जवळ, मुळशी) असे बुडून मृत्यू झाल्याचे नाव आहे. तर आर्यन दीपक आलम (वय १३, रा. बेबडओहोळ) याचा सायंकाळी उशीरापर्यंत शोध सुरू होता.


संतोष हा विवाहित  असून  एक दिवसापूर्वी तो बेबडओहोळ येथील आपल्या नातेवाईकांकडे आला होता. घरातील पाणी संपल्याने संतोष आणि आर्यन हे नातेवाईकांसह पवना नदीवर पोहण्यासाठी गेले होते. पोहोताना दोघेही पाण्यात बुडाले.


याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिवदुर्ग पथक लोणावळा आणि मारूंजी येथील पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण मंडळाचे अग्निशामक दल तसेच एनडीआरएफचे पथक घटनासथळी दाखल झाले. या पथकांनी दोघांचा शोध घेतला. त्यावेळी संतोषचा मृत्यूदेह लगेच सापडला. मात्र, आर्यनचा शोध लागला नाही. सायंकाळी उशीरापर्यंत हे शोधकार्य सुरु होते.


Popular posts
कोरोनाचा संसर्गाला रोखण्यासाठी काही मह्त्त्वाच्या उपाययोजना
Image
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
जेजुरी येथील खंडोबाचे मंदिर (इतिहास)
Image
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करा! लॉक डाऊनग्रस्त श्रमिकांना सहाय्य करा!! मेधा पाटकर आणि सहकाऱ्यांचे केंद्र व राज्य शासनाला आवाहन!!!
Image