लोकार्पण सोहळा ठाणे महानगरपालिकेच्यावतीने व महापौर तथा स्थानिक नगरसेवक श्री. नरेश गणपत म्हस्के यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्र. १९ मध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक लोकार्पण, किसननगर नागरी समूह विकास योजना तसेच विकास प्रकल्पांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सर्व प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उधदवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते तसेच मा.ना.श्री एकनाथ शिंदे, मंत्री, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री, ठाणे जिल्हा यांच्या शुभहस्ते व मा.ना.डॉ.श्री.जितेंद्र आव्हाड, मंत्री, गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मा.श्री.नरेश गणपत म्हस्के, महापौर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
महत्वाच्या घडामोडी विकास प्रकल्पांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा