सराईत गुन्हेगाराकडून ०२ मोटर सायकल हस्तगत करून दोन गुन्हे उघडकीस

ठाणे (विकास पाटील) कासारवडवली पोलीस स्टेशन हद्दीतील आनंद नगर येथे असणारे “राकेश ज्वेलर्स' येथे दिनांक १२.९. २०२० रोजी दुकानातील सुरेश कुमार सोहनलाल जैन वय-५६ वर्षे यांचेवर सोने लुट करण्याच्या उद्देशाने डोक्यावर व हातावर प्राणघातक हल्ला करून सदर दुकानातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरी चोरी करून ते लुटून नेलेबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने कासारवडवली पोलीस स्टेशन येथे २३१/२०२० PC ३९७, ४२७, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)१३५ प्रमाणे दिनांक १२.९.२०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


सदर गुन्हयामध्ये आरोपीत नामे हर्षद राहुल मेश्राम,वय- २३ वर्षे, धंदा-बेकार, रा.भाल,कल्याण व आरोपीत नामे दिनेश दशरथ पवार वय-२५ वर्षे, यांना दि. १२/०९/२०२० रोजी तात्काळ अटक करण्यात आलेली आहे. अटक आरोपीत हे सराईत गुन्हेगार असून, त्यांचेकडे पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या तपासामध्ये आरोपीत यांनी गुन्हयात वापरलेल्या ०२ बजाज कंपनीच्या पल्सर मोटर सायकली एकूण किमंत १,४०,000/- असलेल्या या मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिली असून, त्याबाबत अभिलेख पडताळून पाहता सदर मोटर सायकल हया मानपाडा पोलीस स्टेशन येथून चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. तपासा दरम्यान सदर मुदेमाल हस्तगत करून मानपाडा पोलीस स्टेशन येथील ०२ गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत.



दाखल असलेले गुन्हे


१) मानपाडा पोलीस स्टेशन ठाणे. ३४०/२०२०, भादंवि कलम ३७९ प्रमाणे.  २) मानपाडा पोलीस स्टेशन ठाणे. ३५३/२०२०, भादंवि कलम ३७९ प्रमाणे.


अटक आरोपीत यांचेकडे गुन्हयांचे अनुषंगाने अधिक सखोल तपास सुरू असून,यातील पाहिजे आरोपीत यांचे पोलीस पथका मार्फत ठाव-ठिकाणा प्राप्त करून त्यांना अटक करून मुदेमाल हस्तगत करण्यात येत असून गुन्ह्याचा तपास सुरु आहे.


नमूद कारवाई मा.पोलीस आयुक्त श्री.विवेक फणसळकर,मा.सह पोलीस आयुक्त.श्री.सुरेश कुमार मेकला,मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग,ठाणे श्री.अनिल कुंभारे,मा.पोलीस उपायक्त श्री. अविनाश अंबरे, मा.सहायक पोलीस आयुक्त,वर्तक नगर विभाग श्री.पंकज शिरसाठ, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, पो.नि/अविनाश काळदाते, स.पो.नि सागर जाधव, पो.उप.निरीक्षक/ कुलदिप मोरे, पो.हवा./५६०४ अंकुश पाटील, पोहवा/५४०८ उदय कोरे, पोना/विजय जाधव, पो.ना./४९११ प्रविण घोडके, पो.ना./३०४३ महेंद्र लिंगाळे, तसेच बिटमार्शल पोहवा/१५१७ विरकर, पोना/२०६१ पवार. पो.ना /६६५२ आर.आर.रावते यांनी केलेली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक कुलदिप मोरे हे करीत आहेत.