मुख्यमंत्र्यांचे आवाहन - मुरबाड मध्ये 111 रक्तदात्यांनी केले रक्तदान !!


मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रथा प्रतिसाद देत,

मुरबाड मध्ये 111 रक्तदात्यांनी केले रक्तदान !!

 

मुरबाड : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रात सर्व प्रथम मुरबाड पंचायत समितीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात  3 दांपंत्य, वैद्यकीय अधिकारी यांसह,111रक्तदात्यांनी रक्तदान करून मुख्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

 

यावेळी मुरबाड चे आमदार किसन कथोरे, तहसीलदार अमोल कदम, पो.नि.दत्तात्रय बोराटे, मुरबाड नगरपंचायतचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, नगराध्यक्षा छायाताई चौधरी,तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीधर बनसोडे, पं.स.गटनेते श्रीकांत धुमाळ, सदस्या सिमा अनिल घरत, युवा नेतृत्व चेतनसिंह पवार, पत्रकार अरुण ठाकरे, सह्याद्री प्रतिष्ठाणचे नरेश विशे यांसह मोठ्या प्रमाणात रक्तदाते उपस्थित होते. रक्त संकलनाचे काम कै. वामनराव ओक रक्तपेढी ठाणे या पेढीने केले आहे.

 

याप्रसंगी "मुरबाडकर जिंकणार,कोरोना हरणार" हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून, तालुक्यात सर्वत्तोपरी उपाय योजनांची युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असुन, मुरबाड शहरातील नगरपंचायतच्या वतीने रस्ते धुवून, फवारणी करून, सँनिटायझर व मास्कचे वाटप करून, तसेच बाजार पेठेतील गर्दीचे प्रमाण कमी करण्यासाठी जिवनावश्यक वस्तुंच्या, मेडिकल, दुकानांच्या वेळा निश्चित करून कुणाची उपासमार होणार नाही. याचीही दक्षता घेतली जात आहे. तसेच मुख्यमंत्री व पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गावोगावी-खेडोपाडी ग्रामपंचायत ने एकत्र येत गावच्या वेशी शिळ करत गावातील व्यक्ती ना बाहेर जाऊ दिले जात नाही. आणि बाहेरच्या व्यक्तींना गावात प्रवेश बंद करून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

त्याच धर्तीवर कोरोना ग्रस्तांना कुठे रक्त पुरवठा कमी पडु नये, म्हणून आज मुरबाड पंचायत समितीने सर्व प्रकारच्या दक्षता घेत, रक्तदान शिबिर आयोजित केले होते, त्यात प्राधान्याने कुर्ले कुटुंबिय, सिमा अनिल घरत, गौरी गणेश वारघडे कुटुंबिय, तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीधर बनसोडे यांनी सर्वप्रथम रक्तदान करून मुरबाड तालुका हा महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणारा प्रथम तालुका ठरला असल्याचे गटविकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांनी सांगितले.

 

https://youtu.be/vmV4fl88flA