ठाण्यातील दिवा प्रभागातील बंद असलेले दवाखाने उद्यापासून सुरू


ठाणे : दिवा प्रभागात प्रॕक्टीस करणा-या 61डॉक्टरांनी त्यांचे क्लिनिक मागील 3-4 दिवसांपासुन बंद ठेवले होते म्हणून त्याबाबत आज दिवा येथील डॉक्टर असोसिएशन यांची बैठक मा.सौ.दिपाली भगत सभापती दिवा प्रभाग समिती यांचे कार्यालयात बोलवण्यात आली होती. सदर बैठकीत डॉक्टरांनी कोरोना व्हायरसच्या भितीमुळे आपले क्लिनिक बंद ठेवले आहेत असे सांगितले म्हणून त्यांना त्यांच्या सुरक्षेकरिता श्री.उमेश भगत यांनी मोफत HIV टेस्टिंग किट (use and throw) देतो असे सांगितले तेव्हा उद्यापासुन आम्ही आमचे क्लिनिक सुरु करु असे सांगितले.


सदर बैठकीस मा. उपमहापौर मा.श्री. रमाकांत मढवी साहेब मा.श्री. उमेश भगत व डॉ. सुनिल मोरे सहाय्यक आयुक्त दिवा प्रभाग समिती इत्यादी उपस्थित होते.