वेळ, आपली आणि दुसऱ्याची...


ठाणे : कळव्यातील नगरसेवक मुकूंद केणी यांनी जीवनातील एक सहृदय कहाणी आणि त्यांच्यावर आलेली वेळ इतरांवर कधीही येऊ नये असेही त्यांनी स्पष्ट करताना यावेळी निराधार व्यक्तींना आधार देण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात दैनंदिन जीवनात हातावर पोट असलेली मंडळी, गरीब, गरजू तसेच बेसहारा व्यक्तींपैकी कोणीही भुकेल्या पोटी झोपू नये या उद्देशाने अशा व्यक्ती व त्यांच्या कुटूंबियांना अन्नधान्य पुरविण्यास सुरुवात मुकूंद केणी आणि त्यांच्या टिमने केली आहे. समस्त केणी कुटूंबियांनी या कामात स्वतःला झोकून दिले आहे. कळव्यातील नागरिकांना भाजीपाला सहजगत्या उपलब्ध व्हावा याकरिता देखील मुकूंद केणी यांनी त्यांच्या पत्नी ठामपा विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांच्या बुधाजी नगर येथील जनसंपर्क कार्यालयात माफक दरात भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले आहे.


मुकूंद केणी यांच्या या आदर्शवत उपक्रमास कळवेकर नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतोय.