आम्हाला जेवण नको, फक्त आमच्या घरी जावुद्या


आम्हाला जेवण नको, फक्त आमच्या घरी जावुद्या--मुरबाड मध्ये  अडकलेल्या प्रवाशांची  आर्त विनवणी !!     


मुरबाड : आम्हाला जेवण नको काहीही नको, फक्त आम्हाला आमच्या घरी जाऊ द्या अशी विनंती, मुरबाड मध्ये प्रवासात अडकलेल्या  महिलांनी केल्याने मुरबाड मधील अधिकारी निरुत्तर झाले.


मुरबाड पोलिसांनी सोमवारी ता 30 रोजी वाशी येथून चाळीस लोकांना परभणी येथे घेऊन निघालेला टेंपो पहाटे दोनच्या सुमारास ताब्यात घेतला.आणि चालकावर गुन्हा दाखल करून गाडीतील सर्व लोकांना कुणबी समाज हॉल मध्ये ठेवण्यात आले.  त्यामध्ये दोन गर्भवती महिला  , तीन महिन्याची छोटी मुलगी , सत्तर वर्षाची वृध्द महिला , सतरा लहान मुले व काही महिलांचा व पुरुषांचा समावेश आहे.


या सर्व लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.  त्यांची चहा , पाणी व नाश्त्याची सोय ग्रामस्थांनी केली संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक भोईर यांनी मोठ्या संख्येने असलेल्या लहान मुलांसाठी खेळणी व बिस्किटे वाटप केली त्यानंतर जेवणाची पाकिटे वाटप करण्यासाठी कार्यकर्ते आले असता आम्हाला जेवण नको घरी पाठवा अशी भूमिका घेत त्यांनी जेवण नाकारले व तेथे उपस्थित असलेले गट विकास अधिकारी विश्वनाथ केळकर , मुख्याधिकारी पारितोष कंकाळ , तहसिलदार अमोल कदम , नगराध्यक्षा छाया चौधरी यांना निरुत्तर केले.


ठाणे नवी मुंबई येथून माळशेज घाट मार्गे पुणे , नगर भागात जाणाऱ्या भाजीपाला व इतर सामानाच्या रिकाम्या गाडीतून चोरून प्रवास करणाऱ्या लोकांमुळे मुरबाड पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. तर पोलिसांनी अडवलेल्या वाहनातील लोकांना राहण्याची सोय कुठे करायची असा प्रश्न  स्थानिक प्रशासनाला पडला आहे. 


धसई  येथे अडविलेल्या लोकांची सोय मुरबाडचे माजी आमदार दिगंबर विशे यांनी आपल्या संस्थेच्या आश्रम शाळेत केली आहे. तर मुरबाड येथे सोमवारी पहाटे पोलिसांनी अडविलेल्या टेम्पोतील  चाळीस लोकांना मुरबाड येथील कुणबी समाज हॉल मध्ये ठेवण्यात आले आहे. हे लोक जीव धोक्यात घालून शहरी भागातून ग्रामीण भागात निघाले आहेत.मात्र जिल्हा बंदी आदेशामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून सुरक्षित ठिकाणी ठेवून त्यांना जेवण ,चहा नास्ता,हि व्यवस्था दिली जात असताना. मुंबईतील घरटं सोडल्या नंतर कोरोना सारख्या महामारीतुन जिव वाचवण्यासाठी गावाकडे निघालेली हि मजुर कुटुंबे कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने त्यांना आपल्या गावाकडच्या घराची ओढ लागली असुन, प्रशासन आणि सेवाभावी मंडळीनी अन्न, पाणी काहीही दिले.तरी त्यांना आता ते नको असुन, आम्हाला फक्त आमच्या घरी जावुद्या .अशी आर्त विनवणी केल्याने, या अधिका-यांची मने सुन्न झाली. शेवटी ते सुद्धा.एक माणुसच पण अधिकार आणि कर्तव्य, त्यात सरकारचा आदेश, ते तरी कसा मोडतील.मात्र कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नसुन आहेत त्या ठिकाणी पुढील आदेश होईपर्यत रहा.असे अधिका-यांचे म्हणणे आहे.