एक साधा प्रॉब्लेम, अनेकांना त्रास पण अधिकाऱ्यांच्या दुराग्रहामुळे - उन्मेश बागवे


स्टेशन जवळच्या बाजारपेठेतील हे एक दृश्य


सकाळचे ६.३० ते ८.३० इथे दूर दुरून होलसेल भाजी घेणाऱ्यांसाठी बाजार भरतो... अनेक वर्षे इथून TMT च्या बसेस जात नसत, गेल्या वर्षभरात इथून बसेस जायला लागल्या.. सकाळच्या या गर्दीत गर्दीतून वाट काढत, सतत होर्न वाजवत फक्त अर्धा किमी अंतरासाठी बसेसला पंधरा ते वीस मिनिटे लागतात... सक्काळी सक्काळी ट्राफिक जाम .. मध्यंतरी हा निर्णय बदलून तलावाच्या बाजून मेन रोड ने बसेस वळविण्यात आल्या, आता पुन्हा बाजार-रस्त्यावर मार्ग चालू झाला... फक्त त्रास आणि त्रास
१. अर्ध्या किमीच्या या प्रवासासाठी लाखो रुपयाच इंधन फुकट जात असेल, वीस - बावीस बसची मोठ्ठ्ठी रंग लागते
२. बसेस मधील लोकांना रोज पंधरा ते वीस मिनिटे उशीर होतो, म्हणजे सकाळच्या घाईत लवकर निघावे लागत असेल
३.याशिवाय अंगावर मेहनत करणाऱ्या गरीब भाजी-विक्रेत्यांना, भाजी विकत घेऊन कासार-वडवली, कळवा, येऊर पर्यंत जाणार्या किरकोळ भाजीवाल्यांना व सामान्य नागरिकांना होणारा त्रास तिथे गेल्यावरच कळेल
४. तिथे रहिवाशी असलेल्या नागरिकांना बेसुमार वाजणार्या हॉर्नचा त्रास


पण आपले ठाण्यातील अधिकारी म्हणजे मूर्खपणाचा कळस, बस-मार्ग केवळ दोन तासासाठी बदलू शकत नाहीत, त्यामुळे किती त्रास वाचेल, डिझेलचे पैसे वाचतील. 


भाजी विक्रेते आणि त्यांचे ग्राहक चीड चीड करीत आपले काम करीत राहतात कारण त्यांना दोन तासात कारभार उरकायचा असतो, पोलीस, गावगुंड यांना रोजच्या रोज पन्नास रुपयांचा हफ्ता देताना-घेताना मी अनेकवेळा पहिले आहे, त्यांना शिव्या घालतात बिचारे.. बसमधील प्रवास करणारे प्रवासी तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करतात बिचारे .. कारण कोणाला सांगून कोणी ऐकत नाही, उलट आमचा वेळ फुकट जातो, असे त्यांचे म्हणणे... ड्रायव्हर कावलेले असतात, पण आमचे कोणी ऐकत नाहीत म्हणतात...


एक साधा प्रॉब्लेम, अनेकांना त्रास पण अधिकाऱ्यांच्या दुराग्रहामुळे - उन्मेश बागवे