ज्ञानगकुंज विद्या प्रतिष्ठान शिव समर्थ इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यर्थीनी, पालक शिक्षिका यांचा महिला दिन


महिलादिना चे निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी, महिलांनी  नृत्य , रांगोळी, पाककला ,मेंदी व इतर विविध गुण दर्शन स्पर्धेत भाग घेतला होता.
महिलांना प्रोत्साहन म्हणून शाळेच्या मुख्यध्यपिका व शिक्षकांनी या स्पर्धा चे आयोजन केले  होते.  या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आंबेगाव येथील नगरसेविका सौ स्मिता ताई कोंढरे ,श्री सुधीर भाऊ कोंढरे,आदर्श सरपंच जांभुलवाडी वनिता ताई जांभळे जाधव सर, स्वप्नील काळे उपस्थित होते. स्मिता ताई यांनी महिलांना उद्देशून बोलताना त्यांना या कलेतून लघु व्यवसायाची सुरुवात कशी करता येईल हया बद्दल मार्गदर्शन करून स्पर्धकांचे कौतुक केले.सामाजिक कार्यकर्ती वृषाली वजरीनकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.


'गॅस ओटा' ही कविता सादर करून महिलांचा जिव्हाळ्याचा विषय स्वयपाक ,घरकाम आणि स्त्री यावर आपले मत व्यक्त करत त्यांच्याशी संवाद साधला.
सौ स्मिता ताई कोंढरे यांच्या हस्ते  बक्षीस वितरण पार पडले. या सर्व कार्यक्रमात समर्थ शाळेतील शिक्षिका संस्थापक वंदना पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली महिला दिनाच्या या कार्यक्रमात विद्यार्थीनी ,शिक्षिका आणि आई पालक या सर्व महिलांनी  महिलांसाठी केलेली संकल्पना प्रेरणादायी ठरेल असे मत व्यक्त करून संस्थापक वंदना पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.