या वर्षी नववर्ष स्वागत यात्रा निघणार नाही


ठाणे : माननीय जिल्हाधिकारी यांनी सर्व ठाणे जिल्ह्यातील नववर्ष स्वागत यात्रेच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले होते. कोरोना विषयी  सावधानता म्हणून आपण यावर्षीची यात्रा स्थगित करावी असे सगळ्यांना आवाहन केले. 
ठाणे, डोंबिवली, कल्याण, मीरा रोड यासारख्या विविध ठिकाणच्या नववर्ष स्वागत यात्रेचे प्रतिनिधी या मीटिंगसाठी आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सगळ्यांनी यावर्षी भारतीय नववर्ष स्वागत यात्रा निघणार नाही याची काळजी घेतली जाईल असे मान्य केले, त्यामुळे ठाण्याची मुख्य  यात्रा व त्याच्या अनुषंगाने निघणाऱ्या सर्व उपयात्रा यावर्षी काढल्या जाणार नाहीत असे श्री कौपिनेश्र्वर  सांस्कृतिक न्यासाचे अध्यक्ष श्री उत्तम जोशी यांनी जिल्हाधिकारी यांना आश्वासन दिले आहे 


आजच्या या बैठकीला कोपिनेश्र्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने श्री उत्तम जोशी ,विद्याधर वालावलकर, नरेंद्र पाठक, संजीव ब्रम्हे व मी अश्विनी बापट उपस्थित होतो.
तेव्हा सर्व सहभागी संस्थांना अशी विनंती आहे की या वर्षी आपली नववर्ष स्वागत यात्रा निघणार नाही. मधल्या कालावधीमध्ये आपण काहीना काही उपक्रम कारणासाठी नक्की भेटूया.  कृपया नोंद घ्यावी.


अश्विनी बापट 
कार्यवाह 
श्रीकौपिनेश्वर  सांस्कृतिक न्यास