ठाणे : घोडबंदर रोड रेसिडेंट कम्युनिटी च्या पदाधिकारीसोबत ठाणे महानगरपालिका हेल्थ डिपार्टमेंट चे एचओडी डॉक्टर अनिरुद्ध मालगावकर यांची ठाणे महानगरपालिका मुख्यालयात भेट घेतली. यावेळी देशात जगात थैमान घातलेल्या कोरोना च्या रोगा सोबत सर्व समाजाने एकत्रित येऊन कशा प्रकारे लढा द्यायचा आहे आणि यासाठी विशेषता सोसायटीतील लोकांनी कुठल्या प्रकारची सतर्कता बाळगायची आहे आणि कशा प्रकारे एक सुज्ञ नागरिक म्हणून जागरूकता पसरवायची आहे याबाबत सखोल चर्चा केली. त्याचबरोबर सोसायटीमध्ये बिल्डींग मध्ये कोरोनाच्या बाबतीत जागरूकता पसरविणारे संदेश देणारे पोस्टर देखील प्रसारित केले.
आपल्या प्रत्येकाची एक नैतिक जबाबदारी समजून आपण सर्वांनी आपल्या परिसरातील सोसायटीतील ट्रॅव्हल्स ची हिस्टरी असणाऱ्या लोकांची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या टोल फ्री क्रमांक 1800222108 वर देऊन एक जागृतता आणण्याचं कर्तव्य पार पाडायचे आहे. तसेच सदर बातमी देत असताना एक विशिष्ट गोपनीयता सुद्धा आपण बाळगली पाहिजे जेणेकरून समाजामध्ये कुठल्याही प्रकारची भीती पसरणार नाही आणि म्हणूनच कोरोना पेक्षा भयाचे सावट हे फार मोठे आहे आणि त्या भयभीत वातावरणाचा सामना करण्यासाठी आणि त्याच्यासोबत संघर्ष करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने एक सुज्ञ नागरिक म्हणून याची जबाबदारी स्वीकारायची आहे आणि एक लढा द्यायचा आहे...
कोरोना ला हरविण्यासाठी एक सुजाण नागरिक म्हणून आपण सज्ज व्हायला हवे...