कल्याण 'आरटीओ ला स्वतंत्र इमारत वाहन चाचणीसाठीही कार्यालयाच्या आवारातच मार्गिका

डोंबिवली : जेमतेम चार खोल्यांच्या अपुऱ्या जागेतून कारभार हाकणाऱ्या कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला लवकरच स्वतंत्र इमारत मिळणार आहे. उंबर्डे येथे उभारण्यात येणाऱ्या या इमारतीच्या उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केली असून इमारतीच्या आवारातच वाहनांच्या चाचणीसाठी मार्गिकांची निर्मितीही करण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवलीसह उल्हासनगर, बदलापूर या शहरांतून येथे येणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.


येत्या दोन वर्षांत ही नवी इमारत उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी सहा कोटी रुपयांची निविदा । मागविण्यात आली आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर या शहरांमधील वाहनांची नोंदणी कल्याण शहरातील बिर्ला शाळेजवळ असणाऱ्या कल्याण उपप्रादेशिक कार्यालयात करण्यात येते.


विस्तारत जाणाऱ्या या शहरांमध्ये दरवर्षी ६० ते ७० हजार नव्या वाहनांची खरेदी केली जात असून या सर्व वाहनांची चाचणी आणि नोंदणी कल्याण उपप्रादेशिक कार्यालयात करण्यात येते. असे असले तरी या उपप्रादेशिक कार्यालयाचे कामकाज गेल्या कित्येक वर्षांपासून केवळ चार खोल्यांमधून चालवले जाते.


पुरेशा जागेअभावी या ठिकाणी येणाऱ्या वाहनांची तपासणी शहराच्या बाहेर सुमारे १० किलोमीटरवर असणाऱ्या नांदिवली येथील मार्गिकेवर करण्यात येते. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या वाहनांच्या तपासणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे बोलले जाते. तसेच जुन्या कार्यालयाच्या परिसरात वाहनांसाठी वाहनतळ अपुरे पडते.


यामुळे कल्याण उपप्रादेशिक कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत उभारावी आणि इमारतीच्या जवळ वाहनतपासणी मार्गिका असावी अशी मागणी काही वर्षांपासून जोर धरू लागली होती. तसा प्रस्तावही शासनाकडे कार्यालयातर्फे पाठवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी शासनाकडून या कार्यालयाला मंजुरी मिळाली असून कल्याण डोंबिवली महापालिकेने उंबर्डे परिसरातील भूखंड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी दिला आहे.या ठिकाणी सार्वजानिक बांधकाम विभागातर्फे नव्या इमारतींची उभारणी करण्यात येणार असून नुकतीच या कामासाठी निविदा काढण्यात आली.


Popular posts
चतुरस्त्र लेखक, गूढकथाकार, नाटककार, विचारवंत रत्नाकर मतकरी यांचे दुःखद निधन
Image
गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या एका सराईताला एलसीबीकडून अटक
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करा! लॉक डाऊनग्रस्त श्रमिकांना सहाय्य करा!! मेधा पाटकर आणि सहकाऱ्यांचे केंद्र व राज्य शासनाला आवाहन!!!
Image
सराईत गुन्हेगाराकडून ०२ मोटर सायकल हस्तगत करून दोन गुन्हे उघडकीस
Image