खून करून पसार झालेल्या तिघांच्या 'अँटी रॉबरी स्कॉड'ने आवळल्या मुसक्या


कल्याण : कट-कारस्थान करून एका इसमाचा खून करून पसार झालेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे


पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून वचपा काढण्यासाठी जेवण्याच्या बहाण्याने सागर खैरनार यास रिक्षामध्ये बसवून त्याचा खून करण्यात आला.सागर खैरनार याचेवर सपासप वार केल्याने सागर जागीच मरण पावल्याने त्याचा मृतदेह आरोपींनी कल्याण-शीळ रस्त्यावर फेकून दिला. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला.


याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात दिनांक १३ मार्च,२०२० रोजी गुन्हा र.क्र.१४३/२०२०,भादवि कलम ३०२,१२०(ब) नुसार नोंद करण्यात आला आहे.


कल्याण परिमंडळ ३ च्या 'अँटी रॉबरी स्कॉड' ने समांतर तपास करून डोंबिवली येथील गुन्ह्यातील तीन आरोपी महेश अशोक वलवे,सावन मधुकर शिरसाठ व सूरज राजू सोनावणे यांच्या मुसक्या आवळल्या.


अँटी रॉबरी स्कॉड' चे डॅशिंग सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे यांच्या पथकाने अथक परिश्रम करून गुन्हा उघडकीस आणला, त्याबद्दल पाळदे यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.