मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जनता कर्फ्युमुळे ओस


लोणावळा : जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्याने एरवी वाहनांच्या वर्दळीने गजबजलेल्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज (रविवारी) सकाळपासून शुकशुकाट पहायला मिळाला.


कोरोना या साथीच्या आजाराने देशभरासह मुंबई पुणे ठाणे या शहरांमध्ये थैमान घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आव्हान महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच देशभरातील जनतेने आज जनता कर्फ्यू पाळत घराबाहेर न पडण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.याचा परिणाम मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर देखील झाला आहे. 


नागरिक तसेच पर्यटक घराबाहेर पडत नसल्याने सतत वर्दळीचा असलेला मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग ओस पडला आहे. रस्त्यावर अतिशय तुरळक वाहतूक असून खंडाळा घाट परिसर देखील मोकळा पहायला मिळत आहे. वाहनांच्या रांगांनी गजबजणारे टोल नाके आज मात्र रिकामे-रिकामे पहायला मिळत आहेत. द्रुतगती मार्गावर अगदीच नगण्य संख्येने वाहने दिसत आहेत.       


Popular posts
कोव्हीड 19 बाधित व नॉन कोव्हीड उपचारासाठी स्वतंत्र रुगणालये घोषित, मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे आवाहन
Image
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
या आठवड्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता : एंजल ब्रोकिंग
Image
बळीराजा सुखावला; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
Image