वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेलवर पोलिसांचा छापा, दोन मुलींची सुटका


पुणे : केडगाव - चौफुला येथील धनश्री हॉटेलवर पोलिसांनी छापा मारुन वेश्या व्यवसाय करणाऱ्या 2 मुलींची सुटका केली आहे. याप्रकरणात पोलिसांनी हॉटेल चालकासह तीन आरोपींना अटक केली आहे. हॉटेल धनश्री येथे वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची खात्रीशीर माहीती उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांना मिळाली होती. माहितीनुसार बारामती विभागाच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पथकाने धनश्री हॉटेलवर छापा टाकला आहे. त्यानुसार हॉटेलमध्ये मुलींकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी कारवाई करीत तीन आरोपींना ताब्यात घेतले असून दोन मुलींची सुटका करीत त्यांना महिला सुधार गृहात दाखल करण्यात आले आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल हँडसेट असा 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.