अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन श्री क्षेत्र ओझर ता.जुन्नर येथे नुकतेच शनिवार रविवार , २२, २३ फेब्रुवारी २०२० रोजी मोठ्या दिमाखात संपन्न झाले. संमेलनाध्यक्ष होते जेष्ठ लोककवी साहित्यिक , गीतकार डाॅ. विठ्ठल वाघ तर समाजभूषण जगन्नाथ कवडे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. स्वागताध्यक्ष समाजभूषण जगन्नाथ कवडे होते . याप्रसंगी डॉ. शांताराम कारंडे , राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे , मुंबई अध्यक्ष पत्रकार जयवंत बामणे, संघटक बंडोपंत बोढेकर , उद्योजक संदिपजी नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
सहावे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन, ओझर