कोरोना आपत्तीत ग्रामपंचायतीने कोणतेही कर वसुल करु नयेत


कोरोना आपत्तीत ग्रामपंचायतीने कोणतेही कर वसुल करु नयेत, पं.स.सदस्य श्रीकांत धुमाळ यांची गटविकास अधिकार्‍यांकडे निवेदनद्वारे मागणी
मुरबाड : जगभर पसरलेल्या कोरोना नावाच्या रोगान थैमान घातल्याने, केंद्र सरकारने संपूर्ण देश 21 दिवसांसाठी लाँक डाऊन केला आहे.त्यात नोकर, चाकर, शेतमजुर, पुरता हैराण झाला आहे. उद्योग, धंदे, सर्वांचा रोजगार हिरावला गेला आहे. सर्वसामान्य जनता एकवेळच्या अन्नाला मौताद झाली आहे. रोजगाराचे सर्व पर्याय बंद झाले असताना ग्रामपंचायत कडून गोरगरीब जनतेकडून कर वसुली सुरु असुन ती त्वरित थांबवावी,असे निवेदन मुरबाड पंचायत समिती सदस्य तथा गटनेते श्रीकांत धुमाळ यांनी गटविकास अधिकारी यांना दिले असुन त्याची प्रत मुख्यमंत्र्याना रवाना केली असल्याचे सांगितले आहे.


कोरोना सारख्या महामारीचे जगभर संक्रमन पसरले असुन, भारतातही त्याचा धुमाकुळ सुरु असल्याने संपूर्ण देश गेली 21 दिवस लाँकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील उद्योग, धंदे,रोजगार पुर्णत: बंद झाले आहे. सर्वसामान्य जनता हातावर पोट भरणारे मजुर,कामगार, हताश होवून घरबंदी होवून बसले आहेत. शहरे रिकामी होवू लागली आहेत.मुंबईतील चाकरमानी आपलं झोपडं सोडून गावाकडच्या रस्त्यात अडकून पडला आहे.संपूर्ण देश पुर्णत: थांबला आहे.अशा अवस्थेत जिवन  जगणा-यांकडून सर्व परिस्थिती पुर्ववत होई पर्यंत ग्राम पंचायतीने  कोणतेही कर वसुल करु नयेत, अशी मागणी मुरबाड पंचायत समिती सदस्य तथा गटनेते श्रीकांत धुमाळ यांनी लेखी निवेदना द्वारे गटविकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांचेकडे केली आहे.