मनसेचं शॅडो कॅबिनेट तयार? राज ठाकरेंकडून आज घोषणा?


मुंबई : राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शंडो कबिनेट निर्माण करण्याची घोषणा केली होती. उद्या मनसेच्या वर्धापन दिनी या कबिनेटची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. २५ ते २८ नेत्यांचं हे शंडो कॅबिनेट असणार असून या कबिनेटमध्ये अमित ठाकरे यांना स्थान देण्यात आलं । उद्या ९ मार्च रोजी मनसेचा १४ वा वर्धापन दिन आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीव नवी मुंबईत या वर्धापन दिन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर एक बैठक पार पडली. त्यात शंडो कॅबिनेटच्या नियुक्त्या आणि रचनेवर अंतिम हात फिरविण्यात आल्याचं सांगण्यात येतं. या शंडो कंबिनेट मध्ये बाळा नांदगावकर यांच्याकडे गृह तर संदीप देशपांडे यांच्याकडे र खात देण्यात आलं आहे. तर नितीन सरदेसाईंना वित्त आणि रिटा गुप्ता यांच्याकडे महिला व बालकल्याण विभाग देण्यात आला आहे. या शिवाय अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत आणि रणजीत शिरोडकर यांचा या शंडो कॅबिनेटमध्ये समावेश असणार असल्याची माहिती आहे. राज्यातील ठाकरे सरकारच्या प्रत्येक मंत्र्यांच्या खात्याचा पंचनामा करण्यासाठी आणि सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी हे शंडो कॅबिनेट कार्यरत असेल असं सांगण्यात येतं. त्यासाठी या शंडो कॅबिनेटमध्ये माजी आमदार आणि आजी-माजी नगररसेवकांचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय प्रश्नांची जाण असलेल्या कार्यकर्त्यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. या शंडो कबि नेटच्या पदाधिकाऱ्यांना कामकाज कसं करावं याचं ट्रेनिंग देण्यात येणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. उद्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे या शंडो कंबिनेटची घोषणा करतील. या कॅबिनेटचा कालावधी किती वर्षांचा असेल हे सुद्धा उद्याच जाहीर होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे मनसेचं हे शंडो कॅबिनेट कसं असेल? आणि कशा पद्धतीने ते काम करेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.


असं असेल शंडो कॅबिनेट बाळा नांदगावकरः गृह संदिप देशपांडे नगरविकास, नितीन सरदेसाई: वित्त, दिलीप धोत्रे: सहकार, कृषी: राजू उंबरकर, अमेय खोपकर सांसक तिक, गढ किले अभिजीत पानसे: शालेय शिक्षण, गजानन राणे: कामगार, योगेश परुळेकरपीडब्ल्यूडी, संजय नाईकपरिवाहन, रिटा गुप्ता: महिला, बाल कल्याणकिशोर शिंदेः विधी आणि न्याय.