"अर्बन रेस्ट रूम"चे महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या हस्ते लोकार्पण ठाणे महानगरपालिकेच्यावतीने स्मार्ट सिटी योजने अंतर्गत मासुंदा तलावाजवळील सेंट जॉन बाप्टीस्ट शाळेजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या ''अर्बन रेस्ट रूम"चे लोकार्पण करताना महापौर नरेश गणपत म्हस्के सोबत उपमहापौर सौ पल्लवी कदम, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता पमनानी, नगरसेविका मृणाल पेंडसे, उप नगर अभियंता श्री.पापळकर, कार्यकारी अभियंता चेतन पटेल, उप अभियंता रवींद्र करंजकर आदी.


ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्यावतीने स्मार्ट सिटी योजने अंतर्गत मासुंदा तलावाजवळील सेंट जॉन बाप्टीस्ट शाळेजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या ''अर्बन रेस्ट रूम"चे लोकार्पण आज महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. 


यावेळी उपमहापौर सौ पल्लवी कदम,नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा सौ.नम्रता पमनानी, नगरसेविका मृणाल पेंडसे, उप नगर अभियंता श्री.पापळकर, कार्यकारी अभियंता चेतन पटेल, उप अभियंता रवींद्र करंजकर आदी उपस्थित होते.


स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध महत्वकांक्षी प्रकल्प राबविले जात असून ठाणे शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. या योजने अंतर्गत मासुंदा तलावाजवळील सेंट जॉन बाप्टीस्ट शाळेजवळ नव्याने अर्बन रेस्ट रूम बांधण्यात आले आहे. यामध्ये पुरुषांसाठी 4 व महिलांसाठी 4 अद्ययावत प्रसाधनगृह बांधण्यात आली आहेत. प्रत्येकी 8 लोकर्स उभारण्यात आले आहेत.


महिलांसाठी उभारण्यात आलेल्या वॉश कम रेस्ट रूमध्ये बायो डायजेस्टिव्ह पद्धतीने प्रसाधनगृह, चेंजिंग कम फीडिंग रूम, सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशिन आणि सॅनेटरी नॅपकीन इन्सेनरेटर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात करण्यात आल्या आहेत.