पुण्यात गेल्या ६० तासात एकही 'कोरोना' पॉझीटिव्ह रुग्ण नाही- महापौर


पुणे – पुणेकरांसाठी एक दिलासा देणारी वृत्त आहे. गेल्या ६० तासात पुणे शहरात एक ही कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही.तर कालपासून पाच जण ‘कोरोना’मुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.


पुणे शहरात आता एकूण १४ रुग्ण उपचार घेत असून त्यातील तीन जण हे खासगी रुग्णालयात आहेत, तर ११ रुग्ण महापालिकेच्या नायडू रुग्णालयात उपचार घेत आहेत. याविषयी पुण्याचे महापौर यांनी डॉक्टर, नर्सेस, महापालिका कर्मचारी यांचे आभार मानले आहेत. तर, ‘कोरोना’शी लढण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.