कोरोना साथीत यात्रा घेतल्याने पहिला गुन्हा दाखल


पुणे : राज्य सरकार कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी उपाय योजना करीत असताना शासकीय नियमांचे पालन न केल्याने बावधन यात्रा समितीला चांगलाच दणका बसला आहे.


राज्यात सर्वाधिक 26 कोरोना रुग्ण आढळल्यांनतर साताऱ्यातील बावधन यात्रा समितीवर पहिला गुन्हा दाखल झाला आहे. शासकीय उपाययोजनेत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बावधन यात्रा संयोजन समितीने पोलिसांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता 12 ते 13 मार्चला यात्रेचे आयोजन केले होते. बावधन यात्रा संयोजन समितीने सरकारी उपाययोजनात अडथळा आणल्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन कायद्या अंतर्गत हि कारवाई केली.


या प्रकरणी सचिन शिवाजीराव जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे. भारतीय दंड विधान संहिता कलम 188 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 कालमा अंतर्गत यात्रा आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे.


या समितीचे अध्यक्ष राजेंद्र आबाजी भोसले, उपाध्यक्ष दीपक दीलीप ननावरे, सचिव अंकुश जगन्नाथ कुंभार, खजिनदार सचिन आप्पासो भोसले,  सदस्य संभाजी शिवाजी दाभाडे यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.