उपचारा पेक्षा प्रतिबंध चांगला

 

सध्या कोरोना जीवाणू हाच विषय सर्वत्र ऐकू येतोय आणि ते साहजिकच आहे कारण विषय तसा गंभीर आहे; याच अनुषंगाने आपली रोगप्रतकारकशक्ती वाढवणाऱ्या खाद्य पदार्थांवर प्रकाश टाकावा. शेवटी "उपचारा पेक्षा प्रतिबंध चांगला"

रोगप्रतकारशक्ती ही काही फक्त कारोना शी लढण्या पुरतीच कामी येते असं नाही, ती सर्व वयातील सर्व लोकांनी वाढवली पाहिजे एक सुदृढ व निरोगी आयुष्य जगण्यासाठी. आणि आहारातील व जीवनशैलीतील काही बदल फक्त छोट्या मोठ्या आजारातून नाही तर अगदी मधुमेह, रक्तदाब या सारख्या आजारांपासून ही आपला बचाव करतात.

सर्वप्रथम विषाणू शी लढण्यासाठी सज्ज असतात त्या पांढर‌्या पेशी मग त्यांना योग्य पोषण देणे व नविन निर्माण करण्यास मदत करण्याची जबाबदारी आलीच. त्या साठी हवे योग्य प्रमाणात प्रथिनांचे सेवन . स्रोत- डाळी, कडधान्य, दूध व दुग्धजन्य पदार्थ, सुका मेवा ( बदाम, पिस्ता, काजू, अक्रोड ई.)

पेशींची ताकत वाढवण्यासाठी व व्यवस्थित वाढ होण्यासाठी हवे ते जीवनसत्व B9 म्हणजेच फॉलीक ॲसिड , स्त्रोत - काकडी, पालक, गवार, गाजर, फळे, सुकी फळे जसे बेदाणे, मनुके, अंजीर ई.

लोह प्राणवायू प्रत्येक पेशी पर्यंत पोहोचवण्यासाठी; स्त्रोत - कलिंगड, सीताफळ, खजूर, बदाम, अहळिव , अंजीर, बाजरी, हिरव्या पालेभाज्या, बीट, डाळिंब ई.

सर्वांना माहीत असलेलं जीवनसत्व क; स्त्रोत - लिंबू (दोन्ही वेळच्या जेवणात १/४), संत्री, मोसंबी, पेरू, काळीमिरी, आणि हो रोज आवळा खायला मुळीच विसरायचं नाही. आवळा कोणत्याही प्रकारे चालेल पण रोज सेवन हवंच.

शेवटचे पण अगदी महत्त्वाचे योग्य प्रमाणात पाणी, ते ही शक्यतो कोमट. साधे प्यायले तरीही चालेल पण गार मुळीच नाही.

काही इतर स्वयंपाक घरातील गोष्टी म्हणजे  हळद+सुंठ+मध, सर्दीचा त्रास असल्यास फळांवर आवर्जून काळीमिरी ची पूड आणि पदेलोण भुरभुरावी. तुळशीचे पान खावे आणि हो व्यायाम आवर्जून करावा.

 

सौ. स्वप्नाली लोवलेकर

आहारतज्ञ

9920577569