जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा - सुप्रियाताई सुळे


जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. खुप संघर्षांतून महिलांना समान अधिकार मिळाले.त्याप्रित्यर्थ हा आजचा ८ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो. पण संघर्ष संपला का या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असेच आहे. घरगुती हिंसाचार,हुंडा,महिलांवरील अत्याचार अजूनही सुरुच आहेत.
हे सगळं थांबविण्यासाठी सामाजिक परिवर्तनाची गरज आहे असं आपण सर्वजण म्हणतो.पण सर्वांच्या कृतीतून हा विचार दिसत नाही. बलात्काराची एखादी घटना कुठे घडली तर सगळीकडून आक्रोश ऐकायला येतो. छेडछाड थांबायला पाहिजे.
एखादी महिला बाहेर पडली तर ती असुरक्षित आहे,असं का भासविलं जातं.माझ्या मते महिला दिन हा फक्त एक दिवस साजरा करुन चालणार नाही तर तो वर्षाचे ३६५ दिवस सुरु ठेवला पाहिजे.महिला-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी आपण सर्वांनी काम करण्याची गरज आहे.
शिक्षण,आरोग्य किंवा इतर काही क्षेत्रात बदल दिसतोय. आदरणीय Sharad Pawar साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षण लागू केलं त्याला यंदा २५ वर्षे पुर्ण झाली.त्याची अतिशय चांगली फळे आज दिसतायत. महिला राजकीय निर्णयप्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सामील होताना दिसत आहेत.
आमची राजकीय भूमिका अशी आहे की,महिलांना लोकसभा व विधानभेत आरक्षण मिळालेच पाहिजे.याबाबत राजकीय मतभेद दूर सारुन 'देश प्रथम' या भूमिकेतून आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. आम्ही आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुमारे २५ हजार सायकलींचे वाटप केले.त्याचे परिणाम काय झाले हे आम्ही तपासले.
यामुळे शाळांमधून मुलींची शाळागळती थांबली.आईवडीलांनाही आधार वाटतोय.महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतोय,आपल्या या महाराष्ट्रात जर आपली लेक स्वतःला असुरक्षित समजत असेल तर मग आपण आत्मचिंतन केले पाहिजे.
कालच सादर झालेल्या अर्थसंकल्पात Ajit Pawar दादा, यांनी महाविकास आघाडी सरकारची भरोसा या योजनेची घोषणा केली.याबाबत CMOMaharashtra गृहमंत्री Anil Deshmukh जी आणि महाराष्ट्र पोलीस दलाचे यांचे मनापासून आभार.
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात फक्त महिलांचे 'भरोसा पोलीस स्टेशन' स्थापन करण्यात येणार आहे.पहिला टप्पा जिल्हा,त्यानंतर तालुका अशा स्तरावर हा 'भरोसा' प्रस्थापित होईल.ही पुणे पोलीसांची योजना राज्यपातळीवर येतेय.आपले पोलीस सक्षम आहेत,त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
महाविकास आघाडी सरकारने ट्रान्सजेंडर्ससाठी महामंडळाची स्थापना केली. उपमुख्यमंत्री Ajit Pawar दादा, सामाजिक न्यायमंत्री Dhananjay Munde यांनी यासाठी खुप प्रयत्न केले. @CMOMaharashtra यांनी त्याला प्राधान्य दिले.याबद्दल राज्य सरकारचे खुप खुप आभार.