भुकेलेल्यांना अन्न तर तहानलेल्यांना पाणी देवून आधार


ठाण्यातील श्री महिला बचतगटामार्फत भुकेलेल्यांना अन्न तर तहानलेल्यांना पाणी देवून आधार


ठाणे (प्रतिनिधी) : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे गोरगरीब जनतेला उपाशीपोटी रहावं लागत आहे. तर डाॅक्टर, नर्सेसना यांना  दिवसरात्र काम करुन रुग्णांची सेवा करावी लागत आहे. अशा संकटात सापडलेल्या नागरीकांसाठी श्री महिला बचत गटातर्फे भुकेलेल्यांना अन्न,तर तहानलेल्यांना पाणी देवून सामाजिक कार्य करणाऱ्या दांपत्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतूक करण्यात येत आहे.


कोरोनाचे संकट भारतावर आल्यानंतर याचा प्रभाव विविध शहरातील नागरिकांवर जाणवू लागला आहे. कोणी गोरगरीब जनता उपाशी पोटी झोपत आहे तर कोणी अहोरात्र रुग्णांची सेवा करीत आहे. त्यामुळे एक माणुसकीचा दृष्ट्रीकोन म्हणून श्री महिला बचतगट यांच्या सहाय्याने लोकमान्य नगर पाडा नं. ३ अध्यक्षा प्रिती तरडे व  प्रशांत तरडे व त्याचे सहकारी मित्र सुशांत देबनाथ, महेश शेट्टी, प्रथमेश तेजे, नंदकुमार शहाने व आदींनी नितीन कंपनी तीनहात नाका ब्रीज खालील गोरगरीब लोकांना ज्याचे हातावरचे पोट असते तर  कळवा हॉस्पिटल मधील नर्स व्होर्ड बॉय, अंबुलेन्स ड्रायव्हर, msf फोर्स आदींना जेवण, चहा, पाण्याच्या बाटल्या वाटप करुन माणुसकीचे दर्शन घडविले आहे.


दरम्यान कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर अशा गोरगरीब जनतेला कोणतीच भोजनाची सोय नसली तरी या दांमपत्याच्या सहकार्यामुळे कौतूक होत आहे.