मुरबाड : राज्य शासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग नियंत्रण तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना केली असुन, कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्याचे ग्रामीण क्षेत्र प्रतिबंधित म्हणून जाहीर करण्यात आले आहे.त्यामुळे मुरबाड तालुक्याचे संपूर्ण क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्रात येत आहे.
सद्य स्थितीत मुरबाड तालुक्यात कोव्हीड १९या रोगाचा एकही रुग्ण नसुन ,तालुक्याच्या शेजारील,कल्याण-डोंबिवली महापालिका, ठाणे महापालिका, हे क्षेत्र, कोरोना विषाणुचे हाँटस्पाँट आहेत. या भागातून मुरबाड तालुक्यात लोक येत जात असलेबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. तसेच मुरबाड तालुक्यातुन नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापुर या ठिकाणी अत्यावश्यक सेवा, आस्थापना यामध्ये काही कर्मचारी ये-जा करीत आहेत. या सर्व बाबींमुळे मुरबाड तालुक्यात कोरोना विषाणुचा प्रसार होण्याची भिती नाकारता येत नाही. त्यामुळे मुरबाडचे तहसीलदार तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणून आज आदेश देतो कि मुरबाड शहर व तालुक्यामध्ये, पुणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, बदलापुर, अंबरनाथ तसेच इतर कोरोनाग्रस्त बाधित क्षेत्रातुन कोणीही व्यक्ती आल्यास हदर व्यक्तिस त्याच्या कुटुंबासहित १४ दिवस होम क्वांरटाईन करण्यात येईल. तसेच मुरबाड तालुक्यातील कर्मचा-यांनी कोरोना बाधित नोकरी निमित्ताने ये-जा करू नये.असे सक्त आदेश देण्यात येत आहेत.