लोनावळ्यात गारांसह जोरदार पाऊस


लोनावळा - गेले दोन दिवस वाढलेल्या उष्णतेनंतर अखेर आज ( बुधवारी ) लोणावळा शहरात गारांसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या लोणावळेकरांना दिलासा मिळाला.


लोणावळ्यात काल (मंगळवारी) पासून दुपारनंतर ढग जमा होत होते. 


आज दुपारी चार वाजल्यापासून आकाशात काळ्या ढगांची गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. त्यानंतर अचानक गार वारा सुटला होता.


यातच साडेपाच वाजता पावसाच्या लहान थेंबासोबत गारा पडू लागल्याने सर्वत्र लहान आकाराच्या गाराच गारा दिसू लागल्या होत्या. क्षणात ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट व पावसाच्या धारा लोणावळेकरांना अनुभवायला मिळाल्या.


पावसाच्या दमदार सरींनी वातावरणात काहीसा गारवा आला होता. लहान मुलांनी दारात पावसात भिजण्याचा तसेच गारा गोळा करण्याचा आनंद लुटला.


सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुरुवातीला गारा पडल्या व नंतर जोरदार पाऊस झाला.


Popular posts
कोव्हीड 19 बाधित व नॉन कोव्हीड उपचारासाठी स्वतंत्र रुगणालये घोषित, मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे आवाहन
Image
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
या आठवड्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता : एंजल ब्रोकिंग
Image
बळीराजा सुखावला; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
Image