पुणे - लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यापासून आमच्याकडे व्हॉटसअॅप हॅक झाल्याच्या पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत.
या तक्रारी दाखल करणाऱ्यांमध्ये विद्यार्थीनी, गृहिणी आणि आयटी क्षेत्रातील काम करणाऱ्यांचा समावेश आहे.
सायबर गुन्हेगारांनी त्यांचे व्हॉटस अॅप अकाउनंट हॅक केले व त्यांना ब्लॅकमेल करणे सुरू केले आहे.
या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सायबर सेलचे उपायुक्त संभाजी कदम यांनी शनिवारी शनिवारी या संदर्भात अर्लट जारी केले. तसेच, नागरिकांनी आपली वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीस देऊ नये तसेच व्हॉट्स अॅप किंवा अन्य सोशल मीडियावर आलेल्या एखाद्या संशयीत लिंकवर क्लिक देखील करू नये, असे आवाहनही केले आहे.
लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यापासून आमच्याकडे व्हॉटस अॅप हॅक झाल्याच्या पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत.
या तक्रारी दाखल करणाऱ्यांमध्ये विद्यार्थीनी, गृहिणी आणि आयटी क्षेत्रातील काम करणाऱ्यांचा समावेश आहे.
सायबर गुन्हेगारांनी त्यांचे व्हॉटस अॅप अकाउनंट हॅक केले व त्यांना ब्लॅकमेल करणे सुरू केले आहे.
या प्रकरणी तपास सुरू असल्याचे कदम यांनी सांगितले आहे.