शहरात प्रवेश केल्यास होणार 14 दिवस होम कवारंटाइन


मुरबाड : कोरोनावर प्रतिबंधक उपाय म्हणून मुरबाड तालुका बाहेरील नातेवाईकांना मुरबाड शहरात  प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे. अशी माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली. 


देशात कोरोनाने थैमान घातलेले असताना मुरबाड शहर मात्र अजूनही सुरक्षीत असल्याने नातेवाईक मुरबाड शहरात येण्याची शक्यता वाढली आहे.  असी शंका नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा व नगरसेवक यांनी हा प्रश्न उपस्थीत केला.‌ या प्रश्नाला आमदार किसन कथोरे यांनीही दुजोरा दिल्याने याची अंमलबजावणी नगरपंचायतीच्या वतीने  सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या वतीने मुरबाड नगरपंचायत क्षेत्र प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर केल्याने ही उपाय योजना राबविण्यात येत आहे. मुरबाड शहरातील नागरिकांनी तालुक्या बाहेरील नातेवाईकांना फोन करून या बंदीची माहीती द्यावी असेही आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे. या नियमाला बगल देऊन शहरात प्रवेश करताना नातेवाईक आढळल्यास त्यांच्या हातावर शिक्का मारुन 14 दिवस होम कवारंटाइन केले जाणार असल्याने सद्या तरी मुरबाड तालुक्याच्या बाहेरील नातेवाईकांनी मुरबाड शहरात न आलेलेच बरे.


Popular posts
‘अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त’ पदाचा श्री. संजीव जयस्‍वाल यांनी पदभार स्‍वीकारला
Image
चतुरस्त्र लेखक, गूढकथाकार, नाटककार, विचारवंत रत्नाकर मतकरी यांचे दुःखद निधन
Image
जेजुरी येथील खंडोबाचे मंदिर (इतिहास)
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करा! लॉक डाऊनग्रस्त श्रमिकांना सहाय्य करा!! मेधा पाटकर आणि सहकाऱ्यांचे केंद्र व राज्य शासनाला आवाहन!!!
Image