तेजस्विता प्रतिष्ठान, समता विचार प्रसारक संस्था, आपले ठाणे आपले फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 20 कुटूंबाना जीवनावश्यक साहित्य किराणा माल वाटण्यात आले


ठाणे : तेजस्विता प्रतिष्ठान, समता विचार प्रसारक संस्था, आपले ठाणे आपले फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरातील हरिओम नगर येथील कचरावेचणाऱ्या निराधार महिलांना एकूण 20 कुटूंबाना जीवनावश्यक साहित्य किराणा माल वाटण्यात आले. कारण की संपूर्ण देशात कोरोना वायर्स नि धुमाकूळ घातला आहे त्याच बरोबर लॉक डाऊन चालू आहे. त्यांना बाहेर जाणे शक्यच नाही. ह्या एकल माताना पुढे मागे कोणी नाही. कमवणारी व्यक्ती नाही त्याच बरोबर त्याच सर्व काम हे डम्पिंग मधील कचरा गोळा करून तो भंगार वाल्याला विकला जातो त्यातून तो जो काही पैसे येतील त्या पैशातून ह्याच घर चालत पण सध्या तेही करू शकत नाही व जीवनावश्यक ही साहित्य त्याच्याकडे नाही म्हणून आम्ही एक पाऊल पुढे टाकत ह्या महिलांना जीवनावश्यक किराणा माल त्याच्यापर्यत पोहचवले.


२ तांदूळ किलो, डाळ १ किलो, गहू व ज्वारीचे पीठ प्रत्येकी 3 किलो, तेल 1 लिटर, साखर, १ मीठ असे अनेक किराणा साहित्य आपण त्यांना दिले. त्याच बरोबर आपण मास्क ही दिले व त्याना काही सुरक्षितेचे सूचना ही करण्यात आले.