मुरबाड : महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरु असुन समाजासाठी एक हात मदतीचा,म्हणून मुरबाड तालुक्यात सर्व समाजातील समाज बांधवांना एकत्र घेवून कार्यरत असलेल्या आधार फाऊंडेशन सेवा संस्थेच्या वतीने शोध चांगल्या माणसांचा हे ब्रिद घेवून तालुक्यात जोमाने समाज कार्य सुर आहे.त्यात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ हेतू किंवा राजकीय उद्देश न ठेवता हे कार्य चालू आहे.आज देशावर आलेले कोरोना महामारीचे संकट पहाता, या संकटात सरकारी यंत्रणा जसे पोलीस दल, डॉक्टर, नर्स, सामाजिक सेवाभावी संस्था,ह्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या आदेशानूसार कार्यरत आहेत. त्यात प्रत्येक देशवासियांचे सहकार्य करणे हे कर्तव्य आहे. याच अनुषंगाने या सेवा संस्थेच्या वतीने फक्त सभासदांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्याला अनुसरुन संस्थेचे सभासद कैलास कोर, नितीन राणे, दिनेश भावार्थे, कांतीलाल शिंदे, श्रीकांत धुमाळ, भुषण कोर संतोष चौधरी, अमोल शिंदे, अँड.विलास घरत, जयवंत तुपे, हिरामन राणे, कचरु टेकडे, गणेश भोईर, हरेश म्हाडसे, गजानन भोईर,केशव शिंदे,कांतीलाल पवार, भगवान गारकर,सोमनाथ टेकडे, हरेश पथारे, विलास राणे संतोष घावट, विनि कोर, धनाजी चौधरी, निलेश ढमके, पद्माकर हरड यांनी तात्काळ सहकार्य करून जमा झालेली रक्कम रुपये 25 हजार मुरबाडचे तहसीलदार तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन समिती यांचे कडे धनादेशा द्वारे सुपुर्द करून सहकार्य केले आहे.
आधार सेवा संस्था मुरबाडच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 25हजाराचा धनादेश सुपुर्द