मांजर हुसकावल्याने तरुणीला मारहाण ; चौघांविरोधात गुन्हा दाखल


 पुणे – घरात आलेली मांजर हुसकावून लावल्याने चार जणांनी मिळून तरुणीच्या घरात घुसून तिला मारहाण केली. 


ही घटना रविवारी (दि.५) दुपारी अडीचच्या सुमारास प्रभात कॉलनी वाकड येथे घडली.


शोभा दलपत, तानाजी दलपत, शारदा वाघमारे, कृष्णा वाघमारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 


याप्रकरणी पूजा रमेश दलपत (वय २४, रा. प्रभात कॉलनी, वाकड रोड, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांचे मांजर फिर्यादी यांच्या घरात आले. त्यामुळे फिर्यादी यांनी त्या मांजराला हुसकावून लावले. या किरकोळ कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांच्या घरात प्रवेश करून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी तरुणी जखमी झाली आहे.


वाकड पोलीस तपास करीत आहेत.