मुरबाड : मुंबई पासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या तसेच राजकीय अनावस्थेचा बळी ठरलेल्या मुरबाड तालुक्यात वाढती बेरोजगारी मुलभूत सुविधा पासून वंचित जनता कसे तरी जिवन जगत असतानाच कोरोना व्हायरस मुळे हतबल झालेल्या आदिवासी,मजुर यांना दिलासा मिळावा म्हणून मुरबाड औद्योगिक मॅन्युफॅक्चरींग असोसिएशनच्या माध्यमातून पाच हजारांहून अधिक जीवनावश्यक वस्तूंच्या किट देवून मदतीचा हात दिल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश आग्रवाल यांनी माहिती देताना सांगितले सध्या संबंधित जीवनावश्यक वस्तूंचे वाटप होत असल्याचे निदर्शनास येत आहे मोलमजुरी करून तसेच मासेमारी करून उदरनिर्वाह चालवत असतानाच कोरोनाचे भयानक संकटं येऊन ठेपल्याने सर्व बाजारपेठा बंद अवस्थेत असताना गतीमान जीवन बंदिस्त झाल्याने दोन वेळचे जेवण मिळणे दुरापास्त झाले निवडणुकीच्या काळात शोधत येणारे नेते मात्र दिसेनासे झाले आहेत रेशनिंग धान्य वेळेवर मिळत नसुन शासकीय मदत अद्याप पर्यंत अंधातरीच आहे अशा वेळी धाऊन आली ती औद्योगिक मॅन्युफॅक्चरींग असोसिएशन मुरबाड हि संस्था यांनी पाच हजारांहून अधिक जीवनावश्यक वस्तूंचे वाटप संपूर्ण मुरबाड तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करीत असल्याने मुरबाड तालुक्यातील गोरगरीब जनता धन्यवाद देत आहेत अशा आणिबाणीच्या काळात गोरगरीब जनतेला मदत करणे हे कर्तव्य आहे यात विशेष काही नाही एक मेका साह्य करुन कोरोनाला हरवु असेही असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश अग्रवाल प्रतिक्रिया देताना म्हणाले.