एका महिन्याचे धान्य रेड क्रिसेंन्ट सोसायटी इंडियन आणि  डॉ. नासिर मोहम्मद जुगारी यांनी केले वाटप


लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्‍या लोकांची मोठी कोंडी झाली आहे. उत्पन्नाचे सर्व स्त्रोत बंद झालेले असल्याने गोरगरीबांची मोठी कोंडी झाली आहे.


ही बाब ओळखून गरीब, गरजू अशा ३० कुटंबांना एका महिन्याचे धान्य रेड क्रिसेंन्ट सोसायटी इंडियन आणि  डॉ. नासिर मोहम्मद जुगारी यांनी स्मशानभूमी, बोरवली पूर्व आणि IC कॉलनी, खादी लिंकरोड, बोरिवली पश्चिम येथे वाटले.


ही मदत करीत असताना त्यांनी प्रांतीय, परप्रांतीय असा कोणताही भेद न केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतूक केले आहे.