मुरबाड मध्ये एस एस जी पी प्रोडक्शन व गर्जा कलामंचच्या वतीने मोफत अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !!


मुरबाड : आजमितीस  संपूर्ण देश कोरोना सारख्या विषाणूशी लढत आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर लॉक डाउन व संचार बंदी लागू करून जवळ पास दहा दिवस उलटून गेले आहेत.  सार काही बंद असल्यामुळे हातावर पोट असलेल्या, मोल मजुरी करणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन  आपली सामाजिक बांधिलकी जपत एस एस जी पी प्रोडक्शनचे संचालक मा.श्री. प्रफुल्ल दादा मोरे यांच्या संकल्पनेतून व गर्जा कलामंच मुरबाड च्या माध्यमातून मुरबाड  तालुक्यातील १०१  गरीब गरजू कुटुंबाना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किट  वाटप करण्यात आले.


या प्रसंगी  मुरबाड पोलीस स्टेशन चे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे, जेष्ठ पत्रकार मंगलजी डोंगरे, गर्जा कलामंच मुरबाड चे संस्थापक अध्यक्ष नितेश डोंगरे, तसेच संपूर्ण गर्जा कलामंच टीम उपस्थित होती.  जनसामान्यात  कोरोना विषाणुंची जनजागृती करत  मुरबाड शहर परिसरातील गोऱ्याचा पाडा, बागेश्वरी कातकरीवाडी, कुशाची वाडी,  सुरेश नाना तेलवणे यांची. विटभट्टी वरील मजुर,नागाचा खडक, म्हाडा कातकरी वस्ती, तसेच  मुरबाड परिसरात हे वाटप करण्यात आले.


Popular posts
कोव्हीड 19 बाधित व नॉन कोव्हीड उपचारासाठी स्वतंत्र रुगणालये घोषित, मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे आवाहन
Image
खारटन, नागसेन नगर येथे कोव्हीड वॅारियर्स शहरात जवळपास 600 कोव्हीड वॅारियर्स घालताहेत गस्त
Image
ठाणे महानगरपालिकेची अभिनव योजना,  वस्त्या-वस्त्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कोव्हीड योद्धे आहेत गस्तीवर, नगरसेवकाच्या साहाय्याने कोरोनाविरूद्ध असाही लढा
Image
या आठवड्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता : एंजल ब्रोकिंग
Image
बळीराजा सुखावला; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर
Image