ठेकेदाराने झटकली जबाबदारी मजुरांवर आली उपासमारीची बारी 

               


मुरबाड : मुरबाड तालुक्यात राजकीय वरदहस्त असलेलें मोठं मोठे ठेकेदार शासकीय कामे घेतात या कामासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातील मजुर आणुन  त्यांच्या कडुन रोंजदारीवर कामे करून घेतात व पावसाळा सुरू झाला की त्यांना त्यांच्या गावी पोहोच करतात मात्र या वर्षी कोरोना या रोगाचे संकट अचानक उद्भवल्याने अनेक वर्षांपासून इमानेइतबारे काम करण्याऱ्या या मजुरांना राजकीय वरदहस्त लाभलेला तसेच तालुक्यात मोठे नाव असलेल्या ठेकेदारानी स्वत:ची जबाबदारी झटकून संबंधित मजुरांना चक्क वाऱ्यावर सोडले असल्याचा दुर्दैवी प्रकार निदर्शनास आला आहे.


खेदजनक बाब म्हणजे कोरोना व्हायरसमुळे संबंधित मजुरांना काम बंद करून ठेकेदाराने त्यांना त्यांच्या गावी जाण्यास सांगितले. परंतु अन्य जिल्ह्यांतील हे मजुर असल्याने तसेच घरी जाण्यासाठी जिल्हा बंदीमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्याने त्यांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. दुःखदायक घटना म्हणजे या मजुरांमध्ये गरोदर माता, लहान मुले, तरुण मुली, वृध्द व्यक्ती असुन  त्यांना कोणत्याही गावांत लोकं थांबु देत नाहीत, तर पोलीस सुद्धा त्रास देतात. असे असताना सध्या ते मुरबाड तालुक्यातील वांजळे गावात काही कुटुंब उघड्यावरच राहत आहेत. तर ४३ मजुर मुरबाड शहरात  असलेल्या कुणबी भवन येथे आश्रयाला असुन, काही मजुर भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार दिंगबर विशे यांच्या आदिवासी आश्रमशाळेत आश्रयाला आहेत.


याचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या मजुरांच्या साहाय्याने ठेकेदाराने आजवर  गडगंज पैसा कमावला, त्याच मजुरांना संकटकाळात बाहेरचा रस्ता दाखवणारे हे सत्तेचा माज आलेले ठेकेदार सध्या शासनाने या मजुरांची जबाबदारी घ्यावी असा गळा काढीत असुन धोबी का कुत्ता ना घर का ना घाटका अशा अवस्थेत जगण्याची वेळ असंख्य मजूर कुटुंबावर आल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे.